Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : दूध उत्पादकांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

Milk Rate Issue : देलवडी (ता. दौंड) येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध डेअरीवर न घालता गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत गरजू ग्रामस्थांना मोफत दुधाचे वाटप केले.

Team Agrowon

Pune News : देलवडी (ता. दौंड) येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध डेअरीवर न घालता गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत गरजू ग्रामस्थांना मोफत दुधाचे वाटप केले. या वेळी गावातील अनेक गरजूंनी दूध घेण्यासाठी गर्दी केली होती.

जय मल्हार चौकावरती शुक्रवारी (ता. ८) सकाळी १० वाजता आंदोलन झाले. यावेळी ग्रामस्थांनी गेली १० महिन्यांपासून दूध धंदा कसा तोट्यात आला आहे याचा परिपाक भाषणातून सांगितला.

या वेळी जय मल्हार दूध उत्पादक संस्थेचे माजी अध्यक्ष गणेश लव्हटे म्हणाले, दूध भेसळ व केमिकल युक्त दुधामुळे दुधाचे दर कोसळले आहेत. सध्या दूध उत्पादकांच्या दृष्टीने दूधव्यवसाय तोट्यात गेला आहे.

या आंदोलनाला माजी उपसरपंच बबन शेलार, लक्ष्मण शेलार, कृष्णाजी वाघोले, राजाराम शेलार, दत्तात्रेय शेलार, मच्छिंद्र शेलार, राजेंद्र कोंडे, महादेव शेलार, बाळासो वाघोले, भिवाजी शेलार, संपत लव्हटे, सागर निगडे, गोरख शेलार, संदीप वाघोले, परशुराम शेलार, वाल्मीक शेलार, तात्या काळे, बिभीषण शेलार, वाल्मीक शेलार, बाळासो शेलार, पिन्याभाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT