Onion Disease  Onion
ॲग्रो विशेष

Onion Disease : करपा रोगामुळे बळीराजाच्या डोळ्यांत पाणी

Onion Crop Damage : सफेद कांद्याचे आगर अशी ओळख असणाऱ्या म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे.

Team Agrowon

Palghar News : सफेद कांद्याचे आगर अशी ओळख असणाऱ्या म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. करपा रोगाने कांदा पिकाचे नुकसान होत आहे. या रोगाने शेतकऱ्यांना आर्थिक ठसका लागण्याची वेळ आली आहे.

म्हसरोली गावात सुमारे १०० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. एकरी ३० ते ४० हजार रुपये सफेद कांद्याला खर्च येत असून, यातून एकरी ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. सफेद कांदा उत्तम दर्जाचा असल्याने त्याला समुद्रकिनारपट्टीत मोठी मागणी असते.

मागील वर्षीही कांदा लागवड भुईसपाट झाली होती. त्यामुळे मिळेल त्या भावाला कांदा विकून शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी मात्र कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारीत कांदा लागवड केली.

हवामान बदलामुळे उद्भवणारी बुरशीजन्य रोगराई, करपा रोगाने कांदा उद्ध्वस्त करीत आहे. यासोबत मिरची पीकदेखील करपून जात आहे. योग्य औषधोपचार होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

भाजीपाल्याचा विमा काढावा, जेणेकरून सुरक्षाकवच मिळेल, हे शेतकऱ्यांना ठाऊक असले तरी स्वतःची जागा अनेकांकडे नाही. त्यामुळे विमा काढण्यात अडचणी येतात, असे शेतकरी सांगतात. याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेली चार वर्षे सातत्याने सफेद कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट येत आहे. कांद्याच्या महागड्या बियाणांची लागवड केली, मात्र करपा रोगाने पीक खराब होत असल्याने मोठे नुकसान आम्हाला सोसावे लागणार आहे. सफेद कांदा विक्रीसाठी सरकारने शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.
- अजित पाटील, शेतकरी, म्हसरोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT