Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Water Scheme : खानदेशात सातपुडा पर्वतात टंचाई आहे. त्यात नंदुरबारातील धडगाव, अक्कलकुवा भागातही समस्या असून, या भागात जलजीवन मिशनच्या मदतीने पाणी योजना देण्यात आल्या होत्या.

Team Agrowon

Nandurbar News : खानदेशात सातपुडा पर्वतात टंचाई आहे. त्यात नंदुरबारातील धडगाव, अक्कलकुवा भागातही समस्या असून, या भागात जलजीवन मिशनच्या मदतीने पाणी योजना देण्यात आल्या होत्या. परंतु या योजना व निधी देऊनही संबंधित भागांत टंचाई आहे, पाणीच मिळाले नाही, अशा तक्रारी जिल्हा परिषदेतील सदस्यांनी केल्या असून, यासंबंधी जिल्हा परिषद पाहणी करणार आहे.

जिल्हा परिषदेत निवडणुकीच्या धामधुमीत सदस्य, लोकप्रतिनिधी येत नव्हते. सदस्यांची दखल प्रशासन घेत नव्हते. प्रशासनही निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. अशात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा नुकतीच झाली.

या सभेत सभापती सुहास नाईक, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती संगीता गावित, कृषी सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, सदस्य रतन पाडवी, राया मावची, भरत गावित, जयश्री पाटील, ऐश्‍वर्या रावल आदी उपस्थित होते.

या सदस्यांनी अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांबाबत माहिती दिली. तसेच तक्रारी केल्या. या भागात पाणी योजनांवर १८ कोटी रुपयांचा निधी वितरित झाला. परंतु कामांची स्थिती काय आहे, पाणी मिळत आहे की नाही, असा प्रश्‍न आहे. ज्या गावांत पाणी योजना सुरू होती, तेथे देयके दिली, परंतु पाणीच न आल्याने टंचाई आहे.

कामांवर खर्च केला, तो कसा व कुणासाठी केला, याचा खुलासा करा, अशी मागणी सदस्यांनी केली. पुढे सर्वसाधारण सभा असून, त्यात याबाबत लेखी स्वरूपातील व्यवस्थित माहिती दिली जावी, अन्यथा सभा बंद पाडली जाईल, असा इशारा देण्यात आला.

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी याची दखल घेत संबंधित पाणी योजनांची पाहणी केली जाईल, संबंधित गावांत भेट देवून माहिती घेतली जाईल, असे सांगितले. तालुकास्तरावर सरपंच व पंचायत समित्यांनी याबाबत बैठका घ्याव्यात व माहिती द्यावी, अशा सूचना सदस्य, प्रशासनाने केल्या. या सभेत रस्त्यांची दैना, विंधन विहिरींचे खोदकाम व अन्य कामांबाबत तक्रारी करण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT