Namo Farmer Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Sanman Nidhi : ‘नमो महासन्मान’चा निधी आज लाभार्थ्यांच्या खात्यात

Namo Nidhi Scheme : किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्याने ‘नमो महासन्मान’ या योजनेचा पहिला हप्ता आज, २६ ऑक्टोबरला वितरित केला जाणार आहे.

Team Agrowon

Amravati News : आगामी लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्याने ‘नमो महासन्मान’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता आज, २६ ऑक्टोबरला वितरित केला जाणार आहे. अमरावती विभागातील १२ लाख २५ हजार ३७५ शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये, असा तीन हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये लाभ देण्याची ही योजना आहे. आधी ही योजना महसूल विभागाकडून राबविण्यात येत होती. आता ती कृषी विभागाकडे हस्तांतर केली आहे.

केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसोबतच राज्याच्याही योजनेत तितकाच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही योजनांचे वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत. राज्याची योजना राबविण्यासाठी लॉग-इन आयडी मिळण्यास विलंब झाल्याने व महसूल तथा कृषी विभागातील असमन्वयाने शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासही विलंब झाला आहे.

त्याचा मुहूर्त निघाला असून येत्या २६ ऑक्टोबरला पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १२ लाख २५ हजार ३७५ शेतकरी पात्र ठरले आहेत.

जिल्हानिहाय पात्र शेतकरी

अकोला १,८४,६७३

अमरावती २,६४,९७५

यवतमाळ २,८४,३३३

वाशीम १,६१,३५८

बुलडाणा ३,३०,०३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT