Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : सांगली जिल्ह्यात फळपीक विमा प्रक्रियेला सुरुवात

Crop Insurance Scheme : पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत सुरू झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत सुरू झाली आहे. योजनेत कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

द्राक्ष, पेरू, लिंबूसाठी २५ जून, चिकूसाठी ३० जून, डाळिंबासाठी १४ जुलै आणि सीताफळ फळपिकासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार विमा संकेतस्थळावर अपलोड करावे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास फळपिकासाठी कमीत कमी ०.२० हेक्टर अशी मर्यादा राहील. जास्तीत जास्त चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.

उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहील. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळिंब व द्राक्ष २ वर्षे, पेरू व सीताफळ ३ वर्षे, लिंबू ४ वर्षे, चिकू ५ वर्षे असून या पेक्षा कमी वयाच्या लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

असे असेल स्वरूप

चिकू ः संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ७० हजार रुपये. विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी ३ हजार ५०० रुपये. द्राक्ष - विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ३ लाख ८० हजार रुपये. विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी १९ हजार रुपये. डाळिंब - विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये.

विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी ८ हजार रुपये. लिंबू - विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ८० हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी ४ हजार रुपये. पेरू - विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ७० हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी ३ हजार ५०० रुपये. सीताफळ - विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ७० हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी ३ हजार ५०० रुपये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT