Rohidas Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Rohidas Patil MLA : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं ८९ व्या वर्षी निधन

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री पदाची धुरा रोहिदास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

Dhananjay Sanap

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (ता.२७) निधन झालं. ते ८९ वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून रोहिदास पाटील फुफ्फुसाच्या आजाराशी संघर्ष करत होते. आज सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते.

रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवारी (ता.२८) देवपूर, धुळे येथील घरापासून काढण्यात येणार आहे. एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ७ ते १० दरम्यान त्यांचं पार्थिव नेहरू हाऊसिंग सोसायटीतील सवित्री सभागृहात ठेवण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्यात रोहिदास पाटील यांनी कॉँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. १९९९ विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री पदाची धुरा रोहिदास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तसेच आघाडी सरकारमध्ये विविध खात्यांची मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. महसूल राज्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री या खात्याची मंत्रीपद भूषवले होते.

रोहिदास पाटील यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांचे पुत्र कुणाल पाटील सध्या धुळे ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहेत.

पवारांनी वाहिली श्रद्धांजली

माजी केंद्रिय कृषिमंत्री आणि विद्यमान खासदार शरद पवारांनी रोहिदास पाटील यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. पवारांनी लिहिलं, "काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे फुफ्फुसाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. खान्देश नेते दाजीसाहेब असे स्वत:चे वेगळे वलय निर्माण करणारे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT