Kolhapur Forest Department agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Forest Department : वनविभागाची नवी योजना ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ सवलतीच्या दरात मिळणार झाडे

Forest Departments Scheme : वनविभागाने नवा संकल्प हाती घेतला आहे. ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवली आहे.

sandeep Shirguppe

Amrit Vriksha Aplya Dari Scheme : सध्या झाडे लावा झाडे जगवा या म्हणीचा प्रत्येक पावसाळात निश्चय केला जातो परंतु असे होताना काही अंशी दिसत नाही. परंतु यंदा वनविभागाने नवा संकल्प हाती घेतला आहे. ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवली आहे. १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. यात सवलतीच्या दरात रोपांची विक्री होणार आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनाही वृक्षरोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत.

या रोपांची लागवड करून भविष्यात आपापल्या परिसरात हिरवाई निर्माण करण्याबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहे.

वनविभागातर्फे राज्यभरात वनमहोत्सव भरविण्याचे नियोजन केले आहे. शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस ज्यांच्याकडे जागा आहे, त्यांना त्यांच्या रिकाम्या जागेत वृक्षलागवड करता येणार आहे.

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, यासाठी शाळा -महाविद्यालयांच्या रिकाम्या जागी वृक्षारोपण करावे यासाठी शाळा, महाविद्यालयांनी मागणी केली आहे. पोलिस दलाकडेही स्वतःची जागा व मनुष्यबळ असते. त्यांनाही वनविभागामार्फत मोफत रोपे दिल्यास त्याची लागवडही चांगली होऊ शकते. रोपांची हमीही मिळू शकते. त्यासाठी पोलिस दलास ही रोपे देण्यात येणार आहेत. वरील संस्थांना लेखी पत्राव्दारे मोफत वृक्ष मागणी करता येणार आहे.

रोपांची उचल करून संबधित संस्थांनी स्वतःच्या खर्चाने रोपांची वाहतूक करून रोप लागावडीसाठी नेणे अपेक्षित आहे. अशा रोप लागवडीची माहिती संबधितांना विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, उपवनसंरक्षक यांच्याकडे द्यावी लागणार आहे. लागवड झालेल्या रोपांचा जीओ टॅगिंग केले जाणार आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षांपर्यंत त्यांची संगोपनाची स्थिती जाणून घेतली जाणार आहे. ऑक्टोबर व मे महिन्यांत त्यांच्या नोंदवहीत नोंदी ठेवण्यात येणार आहेत.

‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या योजनेत शहरी तसेच ग्रामीण भागांतील लोकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यात लोकांच्या मागणीनुसार १५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासकीय कार्यालयाच्या आवारात वन विभागातर्फे वनकेंद्रे उघडण्यात येतील. यात सवलतीच्या दरात रोपे देण्यात येणार आहेत, असे कार्यासन अधिकारी व्ही. बी. इंगळे यांचे आदेश वनविभागांना आले आहेत.

सर्वसामान्य व्यक्तींनाही मिळणार सवलतीत रोपे

नऊ महिन्यांची सर्व साधारण प्रजातींचे रोपे : २१ रुपये, १३ रुपये, ११ रुपये

१८ महिन्यांची किंवा त्यावरील रोपे : ५३ रुपये, ३२ रुपये, २६ रुपये

बांबू कंद : ८ रुपये, ६ रुपये

१५ महिन्यांची पिशवीतील बांबू रोपे : १३ रुपये, ९ रुपये.

‘अमृत वृक्ष’ ॲप

वन विभागाने ‘अमृत वृक्ष’ ॲपही सुरू केला आहे. यात ज्या संस्था व व्यक्तींनी वनविभागाकडून रोपे घेतली, लागवड केली, वृक्षांचे संगोपन केले. तसेच वृक्षासंबंधीची माहिती ॲपवर भरता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT