Elephant Rampage Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले, वनविभाग चिंतेत

Wild Animal Attack : मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली, चंद्रपूरपाठोपाठ आता नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याच्या घटना वाढत आहेत.

Team Agrowon

Nagpur News : मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली, चंद्रपूरपाठोपाठ आता नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याच्या घटना वाढत आहेत. मागील आठ महिन्यांत राज्यात ३७ जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक २४ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील आहे.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांचा अधिवास कमी झालेला आहे. वन विभागाने संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, विकासकामे, रस्त्यांचे रुंदीकरण यामुळे नवा अधिवास शोधण्यासाठी भटकंती हे कारण सुद्धा वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

गेल्या आठ महिन्यांत मानवावर हल्ले केलेल्या दोन ते तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. दोन वाघांना जेरबंद करण्यात यशही आले. नुकतेच जिल्ह्यातील झिंझरिया या पेंच प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

त्यानंतर शुक्रवारी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रातील जंगलात गुराख्याचा चराईसाठी गेला वाघाने हल्ला केल्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एका वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून जखमी केले आहे. वाघाची संख्या वाढत असताना नवीन अधिवास शोधणे आणि बफर व जंगलाच्या शेजारी ते येतात. त्यामुळेही संघर्ष वाढू लागले आहे.

‘त्या’ शिकारी वाघाला पकडण्याचे प्रयत्न

पेंच येथील वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करीत आहे. अद्यापही त्याला यश आलेले नसले, तरी कर्मचारी दिवस-रात्र त्याचा मागोवा घेत आहेत. मनुष्यहानी होऊ नये यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात आठ महिन्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ४१ जणांनी जीव गमावला. तर यंदा आठ महिन्यांतच ३७ जणांचा जीव गेल्याचे उघडकीस आले आहे.

वाघाच्या हल्ल्याचे सर्वाधिक बळी

वाघामुळे २४, बिबट्याने १०, जंगली डुकरांच्या हल्ल्यात तीन मृत्यू झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३१ मृत्यू विदर्भात आहेत. नागपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावणाऱ्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र हा नवीन हॉट स्पॉट होत आहे का याचाही अभ्यास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. अल्पकालीन उपाय म्हणून घटना घडल्यानंतर तातडीने मृताच्या कुटुंबीयाला सहकार्य केले जात आहे. मानव व वन्यजीव संघर्षात दोन्हीची हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यावर नियंत्रण मिळवणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असून त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.
- विवेक खांडेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Update : तापमानात घसरण; थंडी, धुक्यात वाढ शक्य

Gokul Dudh Sangh : सहकाराचं सत्ता केंद्र गोकुळ दूध संघ महाडिकांच्या निशाण्यावर, सतेज पाटलांना धक्का बसणार?

Wheat Cultivation : उशिरा गहू लागवडीचे नियोजन

Fruit Crop Farming : फळपिकांतून गाठली आर्थिक सक्षमता

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT