Kolhapur Ajara Crop Loss agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Ajara Crop Loss : गावात वानरांचा, तर शेतात गव्यांचा धुमाकूळ; पिकांचे नुकसान, शेतकरी हैराण

Crop Loss Farmers Panic : गव्यांच्या कळपांनी पेरणोली पंचक्रोशीसह तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीत नुकसान करण्यास सुरवात केली आहे.

sandeep Shirguppe

Ajara Farmers : आजरा तालुक्यात गावात वानरांची टोळी तर शेतात गव्यांचे कळप धुडघूस घालत आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाला असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करीत आहेत. धो धो पडणारा पाऊस आणि जंगली जनावरांचा धुडगुस मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात असलेले पीक डोळ्या देखत बरबाद होत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरला नाही.

नदीकाठानजीकची पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढे व नाले शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये वानरांची टोळी व गव्यांचे कळप सक्रिय झाले आहेत. वानरांचे कळपाने गावात धुडघुस घालत आहेत. घरांच्या छप्परावर उड्या मारणे, कौले फोडणे, परस बागेतील फुले व फळांच्या झाडांची नासधुस करणे असे प्रकार करत आहेत.

पेरणोली, आजरा, आरदाळ, हाळोली यासह अन्य गावात त्यांच्या प्रतापाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दरम्यान गव्यांच्या कळपांनी पेरणोली पंचक्रोशीसह तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीत नुकसान करण्यास सुरवात केली आहे. पेरणोली येथील बांबर नावाच्या शेतात नुकतीच भात रोपलावण केली होती. या रोपलावणीत गव्यांच्या कळपाने धुडघुस घातला. यामुळे विष्णु दारुडकर, शिवाजी दारुडकर व मारुती दारुडकर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

एमेकोंडच्या जंगलात टस्कर

एमेकोंडच्या जंगलात गत पंधरा दिवस टस्कर तळ ठोकून आहे. त्यांने गुरुवारी (ता.१) द्रोण अॅकॅडमीतील पाण्याची टाकी फोडली आहे. अॅकेडमीचे मालक प्रकाश सोले यांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT