Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2023 : मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज ; पूर्व विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

IMD Alert : पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Today Weather Report : बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात मॉन्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. आज (ता. ६) विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. मॉन्सूनचा आस नजीबाबाद, लखनऊ, सतना, रायपूर ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत सक्रिय आहे. ही प्रणाली पोषक ठरल्याने विदर्भासह राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक हवामान होत आहे.

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. आज (ता. ६) पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती

दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली ओडिशा आणि छत्तीसगडकडे सरकण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT