Ganeshotsav 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली जबरदस्ती

Ganeshotsav 2024 : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ‘शारदा गजानन’ गणेशोत्सवासाठी वर्गणीच्या नावाखाली टेम्पोचालक, लहान विक्रेते, कामगारांकडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ‘शारदा गजानन’ गणेशोत्सवासाठी वर्गणीच्या नावाखाली टेम्पोचालक, लहान विक्रेते, कामगारांकडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे. रविवारी (ता.१) टेम्पो चालकांना बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर मंडळाचे धडधाकट कार्यकर्ते आणि पदाधिकारी अडवून १०० रुपयांचे स्टिकर जबरदस्तीने देत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

बाजार समितीमधील गणेशोत्सवासाठी सर्व अडत्यांकडून प्रत्येकी २ हजार रुपयांची, तर तोलणार, कामगार टोळ्यांकडून पावती देऊन वर्गणी घेतली जाते. मात्र याशिवाय टेम्पोचालकांना प्रवेशद्वारावर अडवून केवळ एक स्टिकर देऊन १०० रुपयांची सक्तीची वर्गणी घेतली जात आहे.

याबाबत टेम्पोचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत एक टेम्पोचालक म्हणाला, ‘‘आधीच धंदा कमी आहे आणि त्यात १०० रुपये देणे शक्य नसते. पैसे नाही म्हटल्यावर वर्गणी गोळा करणारे उद्यापासून टेम्पो आत सोडणार नाही अशी धमकी देतात. यामुळे नाइलाजास्तव पैसे द्यावे लागतात.’’

तर गणेशोत्सवाची सक्तीची वर्गणी ही खंडणी वसुली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे परिपत्रक बाजार समितीसह पोलिसांनी काढले आहे. मात्र या दोन्ही परिपत्रकांना गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी हरताळ फासला आहे.

यापूर्वीचा निर्णय बसवला धाब्यावर

काही वर्षांपूर्वी दिवंगत माजी संचालक शेखरबापू कुंजीर हे मंडळाचे अध्यक्ष कायमस्वरूपी उत्सवासाठी एकरकमी प्रत्येक अडत्यांकडून १० हजार रुपये आकारण्यात आले होते. या वर्गणीची मुदत ठेवीच्या व्याजावर गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले होते. मात्र वार्षिक वर्गणी सुरूच असल्याची नाराजी ज्येष्ठ अडत्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT