Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nuksan Bharpai : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५४८ कोटींवर निधीची गरज

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ८३४ गावांतील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका बसला आहे. जिरायती, बागायती, फळपिके मिळून ४ लाख २ हजार २१३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार २१२ रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे.

पुरामुळे २२ गावांतील दीड हजारांवर शेतकऱ्यांची ७७३ हेक्टवर जमीन खरडून गेली आहे. त्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांवर निधीची गरज आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात रविवार (ता. १) ते गुरुवार (ता. १९) या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यात ८३४ गावांतील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे.

सर्व नऊ तालुक्यांतील जिरायती पिकांचे ४ लाख १ हजार ८८.५५ हेक्टर, पाथरी तालुक्यातील बागायती पिकांचे ६७३ हेक्टर, जितूर, पाथरी, गंगाखेड तालुक्यांतील फळपिकांचे ३६१.५० हेक्टर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयांनुसार ५४५ कोटी ४८ कोटी ४ हजार २१२ रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपयांनुसार १ कोटी ८१ लाख ७१ हजार रुपये, फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयांनुसार १ कोटी ३० लाख १४ हजार रुपये मिळून एकूण ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार २१२ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production : सोयाबीन उत्पादन घटणार

Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

Land Dispute : कोट्यवधींच्या सरकारी जमिनीची परस्‍पर विक्री

Diesel Smuggling : समुद्रात खुलेआम डिझेल तस्‍करी

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

SCROLL FOR NEXT