Employment Generation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Rojagar hami Yojana : रोजगार हमीच्या मजुरांना मध्यान्ह भोजन मिळणार

जव्हारच्या तहसीलदार आशा तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.

Team Agrowon

संदीप साळवे

जव्हार : तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह पावसाच्या पाण्यावर पीक घेऊन होत आहे. यात पावसाळ्याचे चार महिने संपले की मिळेल ते मजुरीकाम करून प्रपंच चालविला जातो.

या भागात रोजगार हमी योजनेच्या कामाचे वरदान असल्याने रोजगार उपलब्ध होत असतो; पण मिळणारी मजुरी ही इतर कामाच्या मजुरीच्या तुलनेत अल्प होती.

परंतु आता कामगार विभागाच्या वतीने १६ मार्चपासून माध्यान्ह भोजन सुरू करण्यात आले आहे. यात तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील तीन हजार आठशे मजुरांना याचा लाभ मिळत आहे.

जव्हार तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करीत असताना ऑनलाईन हजेरी, पगार मिळताना होत असणाऱ्या अडचणी यामुळे मजूर मेटाकुटीला आला होता;

परंतु जव्हार तहसीलदार आशा तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना ही अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.

तसेच मजुरांच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर काम व्हावे आणि कामगार विभागाची मध्यान्ह भोजन योजना सुरू व्हावी याकरिता आमसभा होण्यापूर्वी कामगार विभागाला प्रशासानाकडून कळवण्यात आले होते.

शिवाय प्रायोगिक तत्त्वावर एका ग्रामपंचायत मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरूदेखील केली होती. तसेच उपस्थित मजुरांना भोजनाची व्यवस्था व्हावी, याकरिता शर्थीचे प्रयत्न केले व अखेर त्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन तालुक्यात रोजगार हमी योजनेकरिता माध्यान्ह भोजन योजना सुरू झाली.

गेल्या दोन वर्षांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे. रोजगार हमी कामाच्या तुलनेत बांधकाम क्षेत्रात वर्षाला १०० रुपये तरी मजुरी वाढते. सध्या बांधकाम क्षेत्रात मिस्त्रीला ८०० रुपये मजुरी आहे; तर मजुराला ६०० ते ६५० रुपये मजुरी आहे. मात्र, रोजगार हमीवर केवळ २५६ रुपये मजुरी मिळते. महागाईच्या काळात मजुरी पुरत नाही. या दृष्टीनेदेखील मजुरीत वाढ व्हायला हवी.
गणेश मिस्त्री, जव्हार
मजुराला माध्यान्ह भोजन आहार १६ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. सध्या तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये भोजन व्यवस्था सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे.
राणी आखाडे, सहायक कार्यक्रम अधिकारी, तहसील कार्यालय, जव्हार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT