Fog Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Weather Update : पहाटे धुके, दुपारी ऊन अन् सायकांळी सरी

Sindhudurg Weather News : एकीकडे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला असताना दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाडे गडद धुके, दुपारी कडक उन्हाचे चटके आणि सायकांळी काही भागांत पावसाच्या सरी असेच चित्र पाहायला मिळत आहे.

राजेश कळंबटे

Sindhudurg Rain News : एकीकडे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला असताना दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाडे गडद धुके, दुपारी कडक उन्हाचे चटके आणि सायकांळी काही भागांत पावसाच्या सरी असेच चित्र पाहायला मिळत आहे.

रविवारी (ता. ८) सायकांळी उशिरा जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान सोमवारी (ता. ९) पहाटेपासून सर्वत्र धुक्याची झालर पसरली होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अरबी समुद्राच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. एकीकडे मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना सिंधुदुर्गात वेगळेच वातावरण अनुभवायला मिळत आहे. पहाटे दाट धुके, दुपारी उन्हाचे चटके आणि सायकांळी पावसाच्या सरी असे वातावरण आहे.

रविवारी पहाटे प्रचंड धुके जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पडले होते. त्यानंतर सकाळी नऊनंतर उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात झाली. सायकांळी पाचपर्यंत उन्हाचे चटके बसत होते. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अधिकच उष्णा जाणवू लागला होता. जिल्ह्याच्या बहुतांश भागात तापमान ३० ते ३२ अंश सेल्शियस होते.

त्यानंतर सायकांळी सहा सातपासून जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी तालुक्यातील करूळ, कुंभवडे, करूळ घाट, भुईबावडा घाट, नावळे, सडुरे, कुर्ली, कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हरकुळ, नाटळ, नरडवे या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. सोमवारी पहाटेपासूनदेखील प्रचंड धुके पडले होते. सकाळी नऊनंतर उन्हाचे चटके जाणवू लागले होते. सायंकाळपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT