Fodder Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Scarcity : शिरोळ तालुक्यात चाऱ्याची किलोने विक्री

Fodder Shortage : उसाचा हंगाम संपल्यानंतर आता चारा टंचाईचे संकट गडद झाले आहे. आजवर टनाच्या प्रमाणात विकला जाणारा चारा आता किलोवर विकला जात आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : उसाचा हंगाम संपल्यानंतर आता चारा टंचाईचे संकट गडद झाले आहे. आजवर टनाच्या प्रमाणात विकला जाणारा चारा आता किलोवर विकला जात आहे. सध्या शिरोळ तालुक्यात चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून चाऱ्यासाठीचा ऊस ३ रुपये ४० पैसे दराने विकला जात आहे. चार नद्यांच्या तालुक्यातील चाऱ्याची भीषण टंचाई यावरून लक्षात येते.

हंगाम सुरू असतानाही काही प्रमाणात चाऱ्याची टंचाई जाणवत होती. यांत्रिक मशिनद्वारे उसाची तोड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे चाऱ्याची टंचाई भेडसावली. जादा दराने का असेना वाढे उपलब्ध झाल्याने फारशी टंचाई जाणवली नाही. ऊस हंगाम संपल्यानंतर हिरव्या चाऱ्याला मागणी वाढली असून दर गगनाला भिडले आहेत.

सांगली जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता नसलेल्या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस आणला जात आहे. १८०० ते २२०० रुपये प्रतिटन दराने उसाची खरेदी करून तोच ऊस दोन ते तीन पट जादा दराने विकून पशुपालकांची लूट करण्याचा धंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे.

दुधापेक्षा चाऱ्याचा भाव अधिक

चाऱ्याची टंचाई, पशुखाद्यांचे वाढलेले दर, जनावरांची रोगराई, तरुण पिढीकडून जनावरांचा सांभाळ करण्यासाठी सुरू असणारी नकारघंटा यातून तालुक्यात जनावरांची संख्या कमी होत आहे. आता चाऱ्याच्या वाढत्या दराने आणखी एक संकट पशुपालकांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनावरांची संख्या आणखी कमी होणार आहे.

चार नद्यांमुळे ‘सुजलाम् सुफलाम्’ बनलेला शिरोळ तालुका जिल्ह्यात अधिक महसूल देणारा तालुका आहे. मात्र गेल्या काही वर्षांत महापुरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी तोट्यात आला आहे. चार नद्यांच्या समृद्ध तालुक्यात चाराटंचाई म्हणजे चिंतेची बाब ठरत आहे.

ऊस हंगाम संपल्यानंतर चाऱ्याची अधिक टंचाई भासत आहे. हिरवा चारा मनमानी दराने विकला जात आहे. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना वाढलेल्या चाऱ्याचे दर पशुपालकांना परवडणारे नाहीत.
- शिवाजी एजगर,पशुपालक, उदगाव, जि. कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT