Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : साकुर्डे येथे जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप

Fodder Distribution : साकुर्डे (ता.पुरंदर) येथील भैरवनाथ मंदिराजवळ रविवारी (ता.२४) उंड्री गावचे माजी सरपंच, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती बांदल यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील सुमारे १००० जनावरांना उसाचे प्रत्येकी पाच वाढे प्रमाणे सहा हजार भेळ्याचे वाटप करण्यात आले

Team Agrowon

Pune News : खळद, ता.२६ : साकुर्डे (ता.पुरंदर) येथील भैरवनाथ मंदिराजवळ रविवारी (ता.२४) उंड्री गावचे माजी सरपंच, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती बांदल यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील सुमारे १००० जनावरांना उसाचे प्रत्येकी पाच वाढे प्रमाणे सहा हजार भेळ्याचे वाटप करण्यात आले तर येथील परिस्थिती समजून बांदल यांनी येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये साकुर्डे गावातील जनावरांसाठी मोफत चारा वाटपासाठी एक ते दीड लाख रुपयांचा निधी जमा करून देण्याचे जाहीर केले.

दुष्काळामुळे साकुर्डे येथे जनावरांच्या चारा आणि पाण्याची भयंकर समस्या निर्माण झाली आहे. यावर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष युवराज जगताप आणि सरपंच सचिन थोपटे यांनी पुढाकार घेतला.

यावेळी साकुर्डेचे माजी सरपंच मारुती सस्ते, राजेंद्र सस्ते, अरुण मांढरे, राष्ट्रवादी युवकचे अशोक धुमाळ, प्रसाद सस्ते, प्रकाश थोपटे, अमित थोपटे, विश्वास सस्ते, पंढरी लोंढे, एकनाथ सस्ते, तुषार लोंढे, वनिता लोंढे, अनिल चव्हाण, राजू पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गावांमध्ये मोफत चाऱ्याचे वाटप करण्यात आला. दरम्यान, यावेळी सुरेश सस्ते, संभाजी सस्ते, सुरेश ना. सस्ते आदींनी  शेतकऱ्यांच्या व्यथा सर्वांच्या समोर मांडल्या.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष युवराज जगताप यांनी प्रास्ताविक तर सरपंच सचिन थोपटे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT