Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : दर वाढल्याने पाच क्विंटल लाल कांद्यावर डल्ला

Onion Update : सद्यःस्थितीत कांद्याला दर टिकून आहेत. अशातच येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे चक्क शेतकऱ्यांच्या शेतातूनच पाच क्विंटल कांदा चोरीला गेला आहे.

Team Agrowon

Nashik News : सद्यःस्थितीत कांद्याला दर टिकून आहेत. अशातच येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे चक्क शेतकऱ्यांच्या शेतातूनच पाच क्विंटल कांदा चोरीला गेला आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याला सुमारे २० ते २५ हजारांचा भुर्दंड बसला आहे.

चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा संपण्याच्या अवस्थेत आहे. सध्या उन्हाळ कांद्याला पाच हजारांच्या आसपास दर मिळत असून, हळूहळू लाल कांदाही आता बाजारात येत आहे. यंदा परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.

त्यामुळे शेतात निघणाऱ्या कांद्याचे प्रमाणही कमी आहे. लाल कांद्याला बाजारात चार हजारांच्या आसपास दर मिळत आहे. त्यामुळे आता चोरट्यांनी शेतात पडलेल्या कांद्यालाही लक्ष्य केले आहे.

तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सुभाष पाटील यांनी शेतात लाल कांदा साठवून ठेवला होता. हा कांदा त्यांना विक्रीला न्यायचा होता.

मात्र काढलेल्या कांद्याच्या पोळीतून शनिवारी (ता. ३०) रात्री पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी ठेवलेल्या कांद्यापैकी सुमारे पाच क्विंटल कांद्याची चोरी झाली. ३० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती पाटील यांनी दिली. या प्रकरणी चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT