Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : अमरावती जिल्ह्यातील साडेपाचशे गावे टंचाईच्या छायेत

Amravati Water Scarcity : सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे.

Team Agrowon

Amravati News : सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापासून पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.

गतवर्षी पाणीटंचाईची तीव्रता फारशी नव्हती. केवळ २०० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यातील बहुतांश गावे मेळघाटातील होती. मागील वर्षी मे व जून महिन्यात ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता, मात्र यंदाची परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे दिसून येते. यंदा आतापर्यंत सरासरी ४६ टक्केच पाऊस पडला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे नद्या व धरणांमध्ये किमान जलसाठा आहे. शिवाय भूजलस्तरात देखील घट झाली आहे. परिणामी यंदा ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असून टँकरच्या संख्येतसुद्धा वाढ होणार आहे.

आता वर्षभराचा आराखडा

आतापर्यंत तीन टप्प्यांत पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात येत होता. टंचाईची तीव्रता पाहून उपाययोजना सुरू केल्या जात होत्या. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा व एप्रिल ते जून तिसरा, अशा तीन टप्प्यांत आराखड्याची विभागणी केली जात होती. मात्र यावर्षीपासून एकाच टप्प्यात वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसे पत्रसुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने टंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून पाणीपुरवठा विभागाकडून तहसीलनिहाय आराखडे मागविण्यात येत आहेत. अद्याप पाच-सहा तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT