Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : अकोल्यात फळपिक विमा योजनेत पाच पिके

Crop Insurance Scheme : संत्रा व मोसंबी या दोन फळपिकांसाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी एक लाख आहे. शेतकऱ्यांना पीकविमा हप्ता पाच हजार रुपये भरावा.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात यंदा मृग बहार कालावधीत संत्रा, लिंबू,पेरू, डाळिंब व मोसंबी या फळपिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती झाली आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

संत्रा व मोसंबी

संत्रा व मोसंबी या दोन फळपिकांसाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी एक लाख आहे. शेतकऱ्यांना पीकविमा हप्ता पाच हजार रुपये भरावा. मोसंबीसाठी पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडल अधिसूचित आहे. संत्रा पिकासाठी बार्शीटाकळी, मूर्तीजापूर, अकोट, तेल्हारा व पातूर या तालुक्यांतील राजंदा, धाबा,बार्शीटाकळी,पिंजर, महान, खेर्डा, निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड, उमरा, पणज, अकोट, अडगाव बुद्रूक, हिवरखेड, माळेगाव बाजार,तेल्हारा, पातूर, आलेगाव आदी मंडलांचा समावेश आहे.

डाळिंब

डाळिंब पिकासाठी अकोला तालुक्यातील शिवणी हे महसूल मंडल अधिसूचित असून, विमा संरक्षित रक्कम हेक्टरी एक लाख ६० हजार रुपये आहे. या पिकाचा विमा काढण्यासाठी आठ हजार रुपये हप्ता आहे.

पेरू

पेरू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ७० हजार रुपये असून साडेतीन हजार रुपये विमा हप्ता आहे. पेरूसाठी पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडल अधिसूचित आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी उपविभागीय, तसेच तालुका कृषी कार्यालये, कृषी विभाग व विमा प्रतिनिधींशी संपर्क साधावा व विमा योजनेत सहभागी होऊन फळपीक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

लिंबू

लिंबू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ८० हजार व विमा हप्ता चार हजार रूपये आहे. अधिसूचित क्षेत्रात अकोला, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या तालुक्यांतील शिवणी, सांगळूद, बोरगावमंजू, कौलखेड, कापशी रोड, राजंदा, धाबा, महान, खेर्डा बुद्रूक, बार्शीटाकळी, पिंजर, निंबा, जामठी बुद्रूक, कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव,अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट,अडगाव बुद्रूक, हिवरखेड, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी, वाडेगाव, बाळापूर, व्याळा आदी महसूल मंडळे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT