Fishery Agrowon
ॲग्रो विशेष

Fishery Business : मच्छीमारी व्यवसाय अडचणीत

Fish Farming : मत्स्य दुष्काळाचे संकट; मासेमारी उद्योगासमोर आव्हान

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Ratnagiri News : राजापूर, जि. रत्नागिरी : समुद्रात झालेली वादळे, हवामानात झालेला बदल यामुळे आधीच मच्छीमारी व्यवसाय अडचणीत आलेला असताना आता समुद्रात सुटलेल्या मतलई वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे.

त्यातून मच्छीमार व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. लहरी हवामानामुळे मत्स्य दुष्काळाचे मोठे संकट मासेमारी उद्योगासमोर उभे ठाकले असून, मासेमारी करणारे व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत.

पावसाळी हंगामात बंद असणारा मासेमारी व्यवसाय १ ऑगस्टपासून सुरू होतो आणि सर्वसाधारणपणे मे महिन्यापर्यंत समुद्रातील मासेमारी सुरू असते. या वर्षी ऑगस्टपासून सुरू झालेल्या सागरी मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून समुद्रात झालेल्या वादळांचा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर झाला आहे.

बदलत्या हवामानामुळे मासे मिळण्याचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी, हजारो रुपयांचे इंधन खर्च करून बोट समुद्रात नेल्यावर मासळी हाताशी लागत नसल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशा पडू लागली आहे.

अशातच आता मतलई वाऱ्यांचे संकट मच्छीमारांसमोर उभे ठाकले आहे. समुद्रात सुटलेल्या मतलई वाऱ्यांचा परिणाम हा मासेमारी करणाऱ्यांच्या उद्योगावर होत असतो. मतलई वाऱ्यांमध्ये मच्छीमारी नौका समुद्रात नेणे धोकादायक असते. या वाऱ्यांमुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यात अनेक अडथळे येतात.

जरी जाळी टाकली तरी गुरफटली जाते. समुद्रात मासेमारी करायला जाऊन हाती काहीच लागत नाही. त्यामुळे फायदा तर दूरच, उलट मच्छीमारांचे मोठं नुकसान होतं. त्यामुळे मतलई वारे सुटलेले असताना मच्छीमारी नौका किनाऱ्यावर ठेवणे व्यावसायिकांना भाग पडते.



निसर्गाची अवकृपा
या वर्षी आतापर्यंत सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे मासेमारी ठप्प झाली. त्यामुळे या वर्षी मत्स्योत्पादनातही घट होणार असून, मत्स्य दुष्काळाचे मोठे संकट मासेमारी करणाऱ्यांसमोर आहे. कमी प्रमाणात मिळणाऱ्या माशांमुळे त्यांच्या किमतीतही वाढ होणार असल्याने खवय्यांच्या ताटातूनही मासळी गायब होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT