fishing Boat Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Season : मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्र किनारी विसावल्या

Fishing Season Update : मासळीच्या प्रजोत्पादनास पोषक वातावरण व समुद्रात वादळाची भीती असल्याने मासेमारी करण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे.

Team Agrowon

Vasai Fishing News : मासळीच्या प्रजोत्पादनास पोषक वातावरण व समुद्रात वादळाची भीती असल्याने मासेमारी करण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारपासून (ता. १ जून) ते ३१ जुलै पावसाळी मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे.

परवानाधारक बिगर यंत्रचलित नौकांना मासेमारी मुभा देण्यात आल्याचे आदेश पालघर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांनी काढले आहेत. याबाबत जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना पत्र देण्यात आले. त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीचा हंगाम संपणार असल्याने मच्छीमारांनी आवराआवर सुरू केली आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू, विरार, अर्नाळा, वसई, नायगाव कोळीवाडा, पाचूबंदर, तसेच भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनाऱ्यावर दोन हजारांहून अधिक यांत्रिकी बोटींची संख्या आहे. पावसाळ्यात समुद्रात येणारे वादळासह अन्य संकटे पाहता मच्छीमारांना धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे खोल समुद्रात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बोटी परत किनारी आणण्याची लगबग सुरू आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून समुद्रात बोटी जाणार नसल्याने अधिकाधिक बोटी किनाऱ्याला विसावू लागल्या आहेत.

बेकायदा मासेमारी होऊ नये, म्हणून मच्छीमार संस्थांनी दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले. प्रत्येक मासळी उतरविण्याच्या ठिकाणी भितीपत्रकाद्वारे, गावात दवंडी देऊन योग्य ती जागृती करण्यात यावी, अशा सूचना मच्छीमार संस्थांना मत्स्य व्यवसाय विभागाने दिल्या आहेत.

मासेमारी बंदीची कारणे

- उसळणाऱ्या लाटांमुळे समुद्राच्या तळाशी असलेले खाद्य माशांना मुबलक प्रमाणात मिळते. त्‍यांची वाढ चांगली होते.

- मत्‍स्‍य प्रजननासाठी हा कालावधी योग्य असल्याने मासे अंडी सोडण्यासाठी खाडीमुखाशी येतात

- मान्सूनचा कालावधी मत्स्यजीवांच्या प्रजननाचा असल्याने मासेमारी झाल्यास नव्या पिल्लांचा जन्म होणार नाही.

- समुद्र खवळलेला असल्याने नौका बुडण्याची शक्यता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT