Fish Boating Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Boating : बोटी किनाऱ्यावर, दर्याचा राजा रजेवर

Indian Agriculture : सरकारी नियमांचे तंतोतंत पालन करणारा मच्छीमार बांधव पावसाळी हंगामात घरी बसणार आहे.

Team Agrowon

Vasai News : सरकारी नियमांचे तंतोतंत पालन करणारा मच्छीमार बांधव पावसाळी हंगामात घरी बसणार आहे. बोटी शाकारण्याआधी गलबताच्या साह्याने उदरनिर्वाह होणाऱ्या नौकांची डागडुजी, तसेच मच्छी सुकवणे, साहित्याची स्वच्छता करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील मच्छीमार बांधव व्यग्र झाले आहेत. त्यांना कुटुंबातील सदस्यदेखील हातभार लावत आहेत.

मासेमारी व्यावसायिक, खलाशी, कामगार यांना मासेमारीमुळे हाताला काम मिळते. बोटीतून प्रवास करताना मच्छीमार बांधव भाजीपाला, मसाले, तांदूळ, पीठ व अन्य वस्तूंची जमवाजमव करून नेतो, तर मासेमारीसाठी लागणारे साहित्य बोटीत ठेवले जाते.

नैसर्गिक आपत्ती, खोल समुद्रात घोंघावणारे वादळ व पाऊस यापासून मच्छीमार सुरक्षित राहावा, म्हणून मत्स्य विभागाने समुद्रात जाण्याची बंदी घातली आहे. त्यामुळे बोटी माघारी आल्या असून नेलेले साहित्य बोटीतून उतरवत ते टेम्पोच्या साह्याने घरी नेण्यासाठी लगबग सुरू आहे.

पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने काही दिवस आराम मिळतो, मात्र वर्षभर समुद्रात बोट चालवत असल्याने त्याची दुरुस्ती करावी लागते. ते काम आता सुरू होणार आहे. उर्वरित कालावधीत देवदर्शन व अन्य कामे केली जाणार आहेत.
जयेश पाटील, कोळी बांधव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT