Wadhwan Port Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Wadhwan Port : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाला मच्छिमारांचा विरोध

Palghar Wadhwan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे प्रस्तावित असलेल्या बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पाच्या विरोधात रविवारी वाढवणमध्ये मच्छीमार, शेतकरी तसेच विविध संघटनांच्या वतीने एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Swapnil Shinde

Palghar News : मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला योजनेंतर्गत डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर प्रस्तावित आहे. त्यासाठी सरकारने ५१ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता दिली. परंतु या प्रकल्पाविरोधात स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

या प्रकल्पाच्या निषेधार्थ रविवारी वाढवणमध्ये एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो महिला आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी ते “एकच जिद्द वाढवण बंदर रद्द” ही घोषणा ते देत होते.

वाढवण बंदर विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेला पालघर जिल्ह्यातील नायगावपासून गुजरातच्या थेट उंबरगावपर्यंत आणि समुद्रकिनारी गावांसह जव्हार-मोखाडा या डोंगराळ भागातील हजारो स्थानिक भूमिपूत्र उपस्थित होते. आभालवृद्ध, तरुण-तरुणी, मुले, मोठ्या संख्येने सामील होऊन, मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर व्यावसायिक, यांना उदध्वस्त करणारे,वाढवण बंदर कायमचे हद्दपार करण्याची मागणी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT