Fisherman Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Fisherman Hunger Strike : मच्छीमार संस्था अध्यक्षांचे उपोषण आश्‍वासनानंतर स्थगित

Assistant Commissioner of Fisheries Department S. S. Algiri :मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम मच्छीमारांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Team Agrowon

Sindhudurg News : क्यार व इतर चक्रीवादळांतील नुकसानग्रस्त मच्छीमारांना जाहीर करण्यात आलेले विशेष आर्थिक सहाय्य तीन वर्षांनंतरदेखील न मिळाल्यामुळे मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी बुधवारपासून (ता. १७) मत्स्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत मदत दिली जाईल, असे आश्वासन मत्स्य कार्यालयाकडून देण्यात आले. तीन-चार वर्षांपूर्वी झालेल्या क्यार व इतर चक्रीवादळांमध्ये मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने मच्छीमारांना सावरण्यासाठी आर्थिक सहाय्य जाहीर केले.

परंतु हे आर्थिक सहाय्य तीन वर्षांनतंरदेखील मच्छीमारांना मिळालेले नाही. त्यामुळे मालवण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर केलेली मदत तत्काळ मिळावी या मागणीसाठी मत्स्य कार्यालयासमोर बुधवारपासून उपोषण सुरू केले होते.

या वेळी चर्चेसाठी मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. अलगिरी आले असता धुरी यांनी मच्छीमारांना जाहीर करण्यात आलेली ६३ लाख ६० हजारांची मदत कधी देणार ते सांगा, असे बजाविले. या वेळी अलगिरी यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम मच्छीमारांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT