Fish Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Shortage : जाळ्यामंदी लहान मासळी

Fisheries : सध्या वातावरणामध्ये बदल झाल्याने माशांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे अनेक बोटी समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे.

Team Agrowon

Kasa News : डहाणू परिसरातील जाळ्यामध्ये लहान मासळी सापडत असल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या वातावरणामध्ये बदल झाल्याने माशांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे अनेक बोटी समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे. माशांची आवक कमी झाल्याने खवय्यांचे चांगलेच हाल सुरू आहेत.

अनेकदा जाळ्यामध्ये सापडलेले लहान मासे समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी सुकवले जातात. ‘जाळ्यामंदी लहान मासळी येत आहे’, असे डहाणू परिसरातील मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. वाढवण बंदराचा जटिल प्रश्न उभा टाकल्याने अनेक मच्छीमार, शेतकरी नाराज आहेत.

वाढवण बंदर उभारल्यास पुढे काय करावे, या प्रश्नाने चिंताग्रस्त आहेत. त्यात मासेमारीसाठी सध्या खूप लांब जावे लागत असल्याने आणि मासे मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यामुळे अनेकजण खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळत आहेत.

त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून खराब वातावरणामुळे अनेक ठिकाणी पाऊस व वातावरणात बदल होत आहे. जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते राहत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक बोटी समुद्रात न गेल्याने अनेक मच्छी मार्केट, बाजार सुनेसुने झाले आहेत. आहे.

उष्णतेमुळे मासे खोल पाण्यात

काही महिन्यांपूर्वी अनेक मच्छीमारांनी लहान मासे पकडल्याने कमतरतेमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर उन्हाळा सुरू असल्याने पुन्हा मासे खोलवर जात असल्याने मासे मिळणे कठीण झाले आहे. खोल समुद्रात सध्या मच्छीमार बोटी समुद्रात जात नाहीत. त्यामुळे माशांचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने समुद्रात बोटी जात नाहीत. त्यामुळे आम्हाला सुद्धा काम नाही. त्यात खराब वातावरणामुळे मासेदेखील मिळत नाहीत. त्यामुळे मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.
-जयेश तामोरे, मच्छीमार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT