Fish Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Rate : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागणीमुळे मासळीच्या दरात सुधारणा ; पापलेट १४०० तर सुरमई १२०० रुपये प्रति किलो

Sindhudurg Fish Market : मासळी मिळण्याचे कमी झालेले प्रमाण आणि पर्यटन हंगामामुळे वाढलेली मागणी यामुळे मासळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. पापलेट प्रति किलो १४०० तर सुरमईची प्रति किलो १२०० रुपयांनी विक्री सुरू आहे. याशिवाय इतर मासळीच्या दरातदेखील सध्या सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी ः मासळी मिळण्याचे कमी झालेले प्रमाण आणि पर्यटन हंगामामुळे वाढलेली मागणी यामुळे मासळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. पापलेट प्रति किलो १४०० तर सुरमईची प्रति किलो १२०० रुपयांनी विक्री सुरू आहे. याशिवाय इतर मासळीच्या दरातदेखील सध्या सुधारणा झाली आहे.

राज्यातील बहुतांश शाळांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुट्ट्या पडल्या. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पर्यटन हंगाम बहरात आला आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारे, धार्मिक, ऐतिहासीक स्थळांवर पर्यटकांची गर्दी असल्याचे चित्र आहे.

एकीकडे पर्यटकांची गर्दी वाढत असताना दुसरीकडे पर्यटकांना आवश्यक असलेल्या मासळीचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मच्छीमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मच्छीमारांना मिळत असलेली किरकोळ मासळी आणि वाढलेली मागणी यामुळे मासळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे.

सर्वाधिक पसंती असलेल्या सुरमईला प्रति किलो ८०० ते १००० रुपये दर होता. परंतु आता त्यात सुधारणा होऊन तो प्रति किलो १२०० रुपयांपर्यंत गेला आहे. पापलेट प्रति किलो १००० रुपये दर होता, त्यात सुधारणा होऊन तो प्रति किलो १४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय लहान कोळंबी ५००, मोठी कोळंबी ७००, बांगडा २००, सौंदळा ४००, मांदेली २००, बोंबील २०० ते ३०० रुपये प्रति किलो दर आहेत.

मासळी हंगाम ३१ मे पर्यंत चालतो. हा हंगाम सुरू असेपर्यंत हेच दर टिकून राहण्याचा किंवा त्यात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकर सिंधुदुर्गात दाखल होण्यास सुरुवात होते. या कालावधीत मासळीचे दर आणखी सुधारण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT