Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : वाकुर्डे सिंचन योजनेच्या पाण्याच्या आवर्तनाने शेतकऱ्यांना दिलासा

Wakurde Irrigation Scheme : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पहिले आवर्तन सुरू झाले आहे. करमजाई तलावातून ‘वाकुर्डे’च्या बंदिस्त नलिकेद्वारे रेठरे धरण, शिवपुरी तलावात पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Sangli News : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पहिले आवर्तन सुरू झाले आहे. करमजाई तलावातून ‘वाकुर्डे’च्या बंदिस्त नलिकेद्वारे रेठरे धरण, शिवपुरी तलावात पाणी सोडण्यात आले आहे. दोन दिवसांत मरळनाथपूर, सुरूल, तर चार दिवसांत कार्वे, कापरी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडल्याने वाकुर्डे येथील करमजाई व मानकरवाडी तलावात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तिथून पुढे मानकरवाडी येथून रेठरे धरण, शिवपुरी, धुमाळवाडी तलावांत पाणी सोडण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी सोडण्याचे सहा दिवसांचे वेळापत्रक असल्याने त्यानंतर कार्वे, कापरी, इंग्रुळ, शेखरवाडी, जाक्राईवाडी, सुरूल, ओझर्डेकडे पाणी सोडण्यात येणार आहे.

गतवर्षी पावसाळ्यात करमजाई तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी बंदिस्त नलिकेद्वारे रेठरे धरण, कार्वे, शिवपुरी, वाघवाडी, सुरूल, ओझर्डे तलावात सोडले होते. त्यामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती.

पावसाळ्यात सायपन पद्धतीने तलाव मोफत भरून घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. या वर्षी फेब्रुवारीत तलावांच्या साठ्यात घट होऊ लागल्याने रब्बी पिकांसाठी पाण्याची आवश्‍यकता भासत आहे. त्यामुळे तलावांत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांसह अन्य लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार वाकुर्डे योजनेचे पाणी सोडले आहे.

सांगली पाटबंधारे विभागाने रेठरे धरण व शिवपुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार वाकुर्डे योजनेतून पाणी सोडले आहे. शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी सहकार्य करावे. कोणीही मध्येच व्हॉल्व्ह उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पाण्याचा वापर जपून करावा.
- प्रकाश बंडगर, उपविभागीय अभियंता, वारणावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT