Maharashtra Vidhan Sabha agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Aditi Tatkare : राज्यातील पहिला निकाल श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Vidhansabha : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अंतिम टप्प्यातील कौल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय होत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना यशस्वी होताना ठरल्याचे सांगितलं जात आहे. राज्यातील पहिला निकाल श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे.

आदिती तटकरे यांनी १५ व्या फेरीअखेर ५४ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. आदिती तटकरे यांनी ७७ हजार ४३८ मते घेतली असून त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिल नवगणे यांना अवघी २१ हजार १३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांचा विजय होणार, हे निश्चित झालं आहे.

महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांचाही ही योजना राबवण्यात हातभार होता. त्यामुळे लाडक्या बहि‍णींनी आदिती तटकरेंचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या लढाईत सध्यातरी सुरवातीच्या कलानुसार भाजपप्रणित महायुती सत्ता स्थापनेजवळ गेल्याचे दिसत आहे. सुरवातीच्या कलानुसार महायुती तब्बल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप सर्वांत मोठा पक्ष होत असल्याचे दिसत आहे, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०० चा आकडा पार केला आहे. सुरवातीच्या कलानुसार दुपारी बारापर्यंत २८८ पेकी महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ५० जागी आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT