VNMKV Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : राष्ट्रीय परिषदेत ‘वनामकृवि’च्या विद्यार्थ्याच्या निबंधास प्रथम क्रमांक

Agriculture Engineering : कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विशाल दशरथराव काळबांडे यांनी सादर केलेल्या शोध निबंधाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

माणिक रासवे

Parbhani News : मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पार पडलेल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन डेटा सायन्स फॉर क्लायमेट रेसिलेन्स’ यावरील राष्ट्रीय परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विशाल दशरथराव काळबांडे यांनी सादर केलेल्या शोध निबंधाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. या परिषदेत भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अजय देशमुख, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाचे प्रा. डॉ. श्रीकांत जगताप, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग यावर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मशिन लर्निंग टूल किटचा वापर करून माहिती गोळा करण्याचे व तिचे विश्‍लेषण करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे संशोधनाची नवीन दिशा निश्‍चित करण्यात मदत होणार आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, कृषी यंत्र व शक्ती विभाग प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांच्या मार्गदर्शनात हे यश साध्य झाले आहे.

संशोधन प्रक्रियेत महाविद्यालयाच्या सुधा सालगोडे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील तनुजा वाघ, किंजल मोरे, सुजय किंगे, नयन लोनगाडगे, प्रियंका बोरसे, सक्षम पंडितकर, काजल कुमारी या विद्यार्थ्यांनीही उच्च दर्जाचे संशोधन निबंध सादर केले.

या संशोधन निबंधांना स्कोपस इंडेक्स असलेल्या जागतिक स्तरावरील जर्नलमध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळवलेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे मराठवाड्याचे नाव देशभरात उंचावले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT