Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : विश्रांतीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पाऊस

Rain News : एखाद्या भागाचा अपवाद वगळता गेल्या चार दिवसांपासून पावसाने काहिशी विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवारी (ता. ११) सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार वादळी पाऊस झाला.

Team Agrowon

Ahilyanagar News : एखाद्या भागाचा अपवाद वगळता गेल्या चार दिवसांपासून पावसाने काहिशी विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवारी (ता. ११) सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार वादळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. वादळी वाऱ्याने अनेक घरांचे छत उडून गेले.

या पावसामुळे पाणीसाठवणही वाढले आहे. शेतपिके, पशुधन, फळबागांचे मोठे नुकसान झाले. अहिल्यानगर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. चार-पाच दिवसांपासून आता पावसाने विश्रांती दिली होती. मात्र मंगळवारी (ता. १०) अहिल्यानगर हवामान विभागाने जिल्‍ह्यासाठी १४ जूनपर्यंत पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला होता.

बुधवारी सायंकाळी जिल्ह्याच्या राहुरी, नेवासे, पाथर्डी, जामखेड, कर्जत,

श्रीगोंदा व अन्य तालुक्यांतील अनेक गावांमध्ये सायंकाळी पाचनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला. वारे जोरात असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर, काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले.

विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. सुमारे एक ते दीड तास चालेल्या या वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नालेगाव ः २०, सावेडी ः ३३, कापुरवाडी ः ३४, केडगाव, ः २३, भिंगार ः ३२, जेऊर ः ३३, चास ः २६, श्रीगोंदा ः २२, काष्टी ः १९, बेलवंडी ः २७, पेंडगाव ः २८, देवदैठण ः २५, कोळगाव ः २०, भानगाव ः २४, आढळगाव ः २४, कर्जत ः २२, भांबोरा ः २६, कोंबळी ः ३८, वालवड ः २२, खेड ः २५, शेवगाव ः २९, भातकुडगाव ः २९, चापडगाव ः २३, मुंगी ः ५१, पाथर्डी ः २४ माणिकदौंडी ः २१, कोरडगाव ः २७, मिरी ः २७

विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहात असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. विजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर, शेतीची अवजारे, दुचाकीपासून दूर राहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज) कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्‍यासाठी जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज) आजूबाजूला थांबू नये.
- डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप

Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक

Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात

SCROLL FOR NEXT