Seed Supply  Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Supply : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना थेट बांधावर खते, बियाणे पुरवठा

Agriculture Department : तालुक्यात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत बीजप्रक्रीया, खत पुरवठा, व्यवस्थापनाबाबत गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. तालुक्यात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत यांनी बीजप्रक्रीया, उगवणशक्ती तपासणी यावर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर यांनी सांगितले, की गावात गट नसेल तरी ५-१० शेतकरी एकत्र येऊन मागणी करून खरेदी करू शकतात तसेच शेतकऱ्यांनी स्वतःकडील मागील हंगामातील उत्पादित सोयाबीन बियाणे म्हणून वापरावे.

त्यासाठी त्यांनी त्याची उगवण क्षमता तपासणी घरच्या घरी करावी. बांधावर बियाणे खत वाटप व घरचे सोयाबीन बियाणे, माती नमुना तपासणी, बीजप्रक्रिया, उगवणशक्ती तपासणी याची माहिती दिली. थेट बांधावर रासायनिक खते व बियाणे पुरवठा करण्यात आला.

कृषी सहायक एस. के. उमक यांनी उगवणशक्ती कशी तपासणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले. सूत्रसंचालन सचिन गायगोळ यांनी केले. आभार श्री. देवकर यांनी मानले. या वेळी वसंत महल्ले, सरपंच वैभव माहोरे व नितीन टिकार, नीतेश टिकार, केशव तांबडे, आकाश खिरेकर, सुरेश निखाडे, रावजी सुर्वे, प्रतीक जानकर व इतर शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT