MPKV Rahuri Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाणिज्य महासंघाचा पुरस्कार

Agriculture Award : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मानाचा समजला जाणारा नवी दिल्लीस्थित भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा (फिक्की) या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ-२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मानाचा समजला जाणारा नवी दिल्लीस्थित भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा (फिक्की) या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ-२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार भारत सरकारचे ब्रिटिश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन यांच्या शुभहस्ते देण्यात आला व हा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी स्वीकारला. नवी दिल्ली येथे १० वी उच्च शिक्षण शिखर परिषद-२०२४ संपन्न झाली.

या परिषदेमध्ये भारत सरकारचे ब्रिटिश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन, भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव श्री. एस. के. बार्नवाल, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, देशातून आलेले औद्योगीक क्षेत्रातील तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्‍चिम महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. विद्यापीठ पदवीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत तसेच आचार्य पदवीचे शिक्षण देते. आतापर्यंत कृषी विद्यापीठातून १,५६,३३३ विद्यार्थ्यांनी पदव्या प्राप्त केल्या आहेत.

कृषी विद्यापीठाने आतापर्यंत अन्नधान्य, फळे, फुले, चारा पिके यांचे ३०६ हून अधिक वाण विकसित केले असून मृद्‍ व जलसंधारण, पीकलागवड पद्धती, खते आणि पाणी व्यवस्थापन, रोग व किडीचे नियंत्रण, अवजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रिया, दुग्धशास्त्र या विषयी संशोधन करून १८६६ हून अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी, ५१ सुधारित कृषी अवजारे आणि ४ पेटंट प्रसारित केले आहेत.

विस्तार शिक्षण कार्यातही विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कृषी विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तारात केलेले अभूतपूर्व कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT