Cloudy Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : ढगाळ हवामान, पावसाने शेतकरी चिंताग्रस्त

Unseasonal Rain : मंगळवारी (ता.९) सकाळपासूनच जिल्‍ह्याच्या विविध भागांत हलका पाऊस झाला, तर दुपारी पावसाचे प्रमाण वाढले.

Team Agrowon

Pune News : मंगळवारी (ता.९) सकाळपासूनच जिल्‍ह्याच्या विविध भागांत हलका पाऊस झाला, तर दुपारी पावसाचे प्रमाण वाढले. पुणे शहरासह, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर, खेड, आंबेगाव शिरूर परिसरात पाऊस झाला. ढगाळ हवामानही कायम आहे.

त्यामुळे कांदा, आंबा, द्राक्ष आणि भाजीपाला आणि ज्वारी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू होण्याच्या तयारीत आहे. नुकतीच काही ठिकाणी द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे.

मात्र गेल्या दोन दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जुन्नर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात विविध जातीच्या द्राक्ष बागा आहेत. जानेवारीअखेर तोडणी हंगाम सुरू होईल.

तालुक्यात २६ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सुमारे पन्नास मिलिमीटर अवकाळी पाऊस पडला. याचा सर्वाधिक फटका फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला आहे. फूलगळ व फळकूज झाल्यामुळे घडांच्या साखळ्या झाल्या आहेत.

रब्बी पिकांवर तांबेरा

नारायणगाव परिसरात शनिवारी (ता. ६) पासूनच ढगाळ आणि पावसाळी वातावरण आहे. शनिवारी सायंकाळी मध्यम पाऊस पडला. त्यानंतर ढगाळ वातावरण आहे. प्रतिकूल हवामानामुळे कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांवर कीड व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT