Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : ‘एमआयडीसी’च्या प्रस्तावित प्रकल्पाच्या आडवनमधील भूसंपादनाला तूर्तास स्थगिती

Nashik MIDC Project : इगतपुरी तालुक्यातील आडवन व पारेगाव भागातील भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिलेला लढा अखेर यशस्वी ठरला आहे.

Team Agrowon

Nashikn News : इगतपुरी तालुक्यातील आडवन व पारेगाव भागातील भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिलेला लढा अखेर यशस्वी ठरला आहे. ‘एमआयडीसी’च्या प्रस्तावित प्रकल्पासाठी होणाऱ्या जमिनीच्या संपादनावर तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला. हे यश खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मध्यस्थीमुळे मिळाले आहे.

भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. यापूर्वीच ७० टक्के जमीन संपादित झाली असून, उरलेल्या शेतीयोग्य व बागायती जमिनीही जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी (ता. २७) उग्र स्वरूप धारण केले होते.

काही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करीत प्रशासनाचे लक्ष वेधत संताप व्यक्त केला. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन खासदार वाजे यांनी तत्काळ उद्योगमंत्री सामंत यांच्याशी संपर्क साधत शेतकऱ्यांच्या भावना आणि परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर बुधवारी (ता. २८) मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार वाजे आणि शेतकरी शिष्टमंडळाने थेट

मंत्री सामंत यांच्यासमोर बाजू प्रभावीपणे मांडली.

बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन भूसंपादनाच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, येत्या २ जूनला सविस्तर चर्चा व पुढील निर्णयासाठी खासदार वाजे आणि शेतकरी शिष्टमंडळाला पुन्हा मंत्रालयात बोलावण्यात आले.

इगतपुरी तालुक्यात यापूर्वीच ५० टक्क्यांपेक्षा अधिक जमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित झाल्याने उरलेली शेतीयोग्य जमीनही जाण्याच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.यामुळेच या नव्या भूसंपादनास विरोध होत होता. खासदार वाजे यांच्या सक्रिय शिष्टाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.उद्योगमंत्री सामंत यांनीही सकारात्मक भूमिका घेत ही प्रक्रिया ‘जैसे थे’ स्थितीत ठेवली आहे.

२ जूनला निर्णायक बैठक

२ जूनला होणाऱ्या बैठकीत यासंबंधी अधिक माहिती घेत ठोस निर्णय होण्याची शक्यता असून,मंत्री सामंत यांनीही यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक आशेचा किरण ठरत आहे. मात्र बैठकीत अंतिम काय निर्माण होतो याकडे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT