Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew MSP : काजू बी हमीभावासाठी कृषिमंत्र्याची भेट घेणार

Cashew Rate : काजू बी हमीभावासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या काजू उत्पादकांनी गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेतल्यानंतर आता राज्याच्या कृषिमंत्र्याची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : काजू बी हमीभावासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या काजू उत्पादकांनी गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेतल्यानंतर आता राज्याच्या कृषिमंत्र्याची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवर काजू बीला दर मिळावा, अशी मागणी काजू उत्पादक करणार आहेत.

काजू बी दरासाठी गेले वर्ष-दीड वर्ष काजू उत्पादक विविध पातळ्यावर आंदोलन करीत आहेत. काजू बीला किमान प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी काजू उत्पादकांची होती. विद्यापीठाच्या अहवालानुसार काजू बीला प्रतिकिलो १२९ रुपये खर्च येतो.

त्यामुळे किमान त्यापेक्षा वीस ते पंचवीस रुपये अधिक दर मिळावा, अशी काही उत्पादकांची मागणी होती तर फळबागायतदार संघाने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दीडपट म्हणजे प्रतिकिलो दोनशे रुपये दर मिळावा, अशी मागणी केली आहे. परंतु आता काजू उत्पादकांनी गोवा शासन कशा पद्धतीने काजू उत्पादकांना हमीभाव देते याची माहिती घेण्यासाठी गोवा कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली.

या वेळी मंत्री नाईक यांनी आपण काजू उत्पादकांना प्रतिकिलो १७० रुपये दर देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उत्पादकांना सांगितले. त्यानंतर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत काजू उत्पादकांची सावंतवाडीत बैठक झाली.

या बैठकीला अर्चना घारे, फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, दिवाकर मावळणकर, अशोक सावंत, आकाश नरसुले, संजय देसाई यांच्यासह अनेक काजू उत्पादक उपस्थित होते.

या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्याच्या धर्तीवर राज्यात काजू बीला दर द्यावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच मंत्री श्री. मुंडे यांची भेट काजू उत्पादक घेणार असून किमान प्रतिकिलो १५० रुपये, द्यावा अशी मागणी करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT