Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : चाळीस दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे पैसे

Onion Payment : कांदा विक्री केलेल्या तालुक्यातील ४०६ शेतकऱ्यांना आता ४० दिवसांत म्हणजेच १० जानेवारी २०२५ पर्यंत पैसे देण्याचे लेखी आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिले आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : कांदा विक्री केलेल्या तालुक्यातील ४०६ शेतकऱ्यांना आता ४० दिवसांत म्हणजेच १० जानेवारी २०२५ पर्यंत पैसे देण्याचे लेखी आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिले आहे. आ. प्रा. रमेश बोरनारे यांनी केलेली मध्यस्थी व बाजार समितीचे लेखी पत्रामुळे शेतकऱ्यांनी घोषित आंदोलन तूर्तास थांबविले आहे.

माहितीनुसार, बाजार समितीच्या घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये सागर सुनील राजपूत याने सुमारे ४०६ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. मात्र त्या शेतकऱ्यांचे पैसे न देता सागर फरार झाला होता. त्याच्यावर बाजार समितीने फिर्यादी होत गुन्हा दाखल केला.

गत सोमवारी (ता. २५) शेतकऱ्यांनी समितीत चांगलाच राडा घातला होता. कांद्याचे पैसे देत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार लिलाव बंद करण्यात आले होते.

दरम्यान या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २८) आ. प्रा. रमेश बोरनारे यांनी बाजार समितीत शेतकऱ्यांची भेट घेऊन लिलाव सुरु करण्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी सर्व शेतकरी उपस्थित नसल्याने मार्ग निघाला नव्हता. त्यामुळे शनिवारी (ता. 30) शेतकऱ्यांची स्वतंत्र तसेच संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी आ. प्रा. रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांना तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी समिती बांधील आहे.

शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बुडणार नाही. याबाबत त्यांनी स्वतः बाजार समितीची हमी घेतली. शेतकऱ्यांना ३० दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन आ. प्रा. बोरनारे यांनी दिले. त्यावर शेतकऱ्यांनी चर्चा करून १० दिवस जास्तीचे घ्या, परंतु ४० दिवसांत सर्व पैसे देण्याची मागणी केली. त्यानुसार ४० दिवसात शेतकऱ्यांचे पैसे देण्यावर एकमत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करून लिलाव सुरू करण्याचे ठरले.

यावेळी बाजार समिती सभापती रामहरी जाधव, माजी प. स. सभापती बाबासाहेब जगताप, संचालक ज्ञानेश्वर जगताप, कल्याण दांगोडे, गणेश इंगळे, प्रशांत सदाफळ, प्रवीण पवार, प्रशांत त्रिभुवन, कल्याण जगताप, संजय निकम, गोरख आहेर, देविदास वाणी, मधुकर पवार, सचिव प्रल्हाद मोटे, सहसचिव संदीप निकम, गणेश तांबे, दत्तू गायकवाड, दिनेश साळुंके आदींसह शेतकरी उपस्थित होते.

याप्रकरणात, कांदा खरेदी करून फरार झालेल्या त्या व्यापाऱ्याची पर राज्यातील व्यापाऱ्यांकडून जमा होणारी रक्कम, जामीनदारांची अनामत व संबंधितांचे शेड विक्रीतून येणारी रक्कम एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कमी पडणारी उर्वरित रक्कम बाजार समिती देणार आहे. तसे बाजार समितीकडून लेखी देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT