Ladakh Tourism  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladakh Tourism : शेतकरी ट्रॅक्टरमधून निघाला पर्यटनासाठी लडाखला

Tractor Tourism : तिसगाव ते लडाख असे २ हजार १५० किमीचा प्रवास हा तरुण शेतकरी आपल्या ट्रॅक्टरने करीत आहे. ट्रॅक्टरला ट्रॉली लावून आवश्यक साहित्यासह लडाखच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे.

Team Agrowon

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कुठे फिरायला जायचे नियोजन करत असाल तर रेल्वे, विमान, बस किंवा चारचाकी वाहनाचे नियोजन केले जाते. काही पर्यटक सायकल किंवा पायीदेखील जायचे स्वप्न बघतात. मात्र दिंडोरी तालुक्यातील तिसगावचा अक्षय इखे हा तरुण शेतकरी दोन मित्रांसमवेत चक्क ट्रॅक्टरमधून लडाखला निघाला आहे. त्यांनी पाच दिवसांत १२०० किमीचे अंतर पार केले आहे.

तिसगाव ते लडाख असे २ हजार १५० किमीचा प्रवास हा तरुण शेतकरी आपल्या ट्रॅक्टरने करीत आहे. ट्रॅक्टरला ट्रॉली लावून आवश्यक साहित्यासह लडाखच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे. पर्वतातून खळखळणाऱ्या, बर्फाळ प्रदेश अशा निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद व तोही आगळ्यावेगळ्या ट्रॅक्टर सफरीने करण्याचे अक्षयचे स्वप्न होते. त्याच्या पूर्तीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.

अक्षयचा छंद म्हणजे इन्स्टाग्रामवर रिल्स बनविणे. उदरनिर्वाहासाठी तो द्राक्ष, टोमॅटो, कांदा आदी पिकांची शेती करतो. काही तरी नवीन करायचे स्वप्न तो बघत होता. त्याच वेळी दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरने जायचे त्याने ठरविले. शनिवारी (ता.२२) तो गावातून लडाखकडे निघाला.

प्रवासाची परिपूर्ण तयारी

अक्षय यास लहानपणापासून ट्रॅक्टरविषयी आकर्षण आहे. त्यासंबंधीचे व्हिडिओ त्याने समाजमाध्यमांवर अपलोड केले आहेत. लडाखला निघताना संरक्षणासाठी प्लॅस्टिक ताटपत्रीचा वापर करून ट्रॉली बंदिस्त केली. आवश्यक कपडे, अंथरूण पांघरूण, गॅस शेगडी, शिधापाणी असे आवश्यक साहित्य सोबत घेऊन त्याने प्रवासाची चोख तयारी केली आहे.

रोज २५० ते ३०० किमी अंतराचा प्रवास करीत आहे. रस्त्यात ठिकठिकाणी शेतकरी व नागरिक संवाद साधतात. पुढील सहा सात दिवसांत लडाखला पोहचण्याचे नियोजन आहे.
- अक्षय इखे, युवा शेतकरी, तिसगाव, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT