Wild Animal Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शेतकरी वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Wild Animal Damage In Crop : मालेगाव तालुक्यातील मेडशी वन परिक्षेत्रातील शेतकऱ्यांचे मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तूर, हरभरा पिकांचे वन्यजीवांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Team Agrowon

Washim News : मालेगाव तालुक्यातील मेडशी वन परिक्षेत्रातील शेतकऱ्यांचे मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तूर, हरभरा पिकांचे वन्यजीवांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामेही केले गेले. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे.

गेल्या काळात उभ्या पिकांचे जंगलातील हरिण, रोही, रानडुक्कर या वन्य प्राण्यांकडून अतोनात नुकसान झाले होते. सदर पिकाचे तत्काळ पंचनामे वनविभागाकडून केले गेले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आर्थिक स्वरूपात मंजूर पण केली. मात्र ती रक्कम अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत.

वन्य प्राण्यांकडून जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असते. वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या आणि त्यावर नसलेले नियंत्रण यामुळे शेतकरी कायम नुकसान झेलत आहे.

मुख्य म्हणजे कायदे आणि योजना असताना सुद्धा वन विभागाकडून जंगलागत शेती असलेल्या शेतकऱ्यांना सौर-तार कुंपण योजना किंवा जैविक शेती कुंपणासाठी अनुदान देऊन त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात नाहीत. नुकसान भरपाई पण ही योग्य वेळेत दिली जात नाही. त्यामुळे वन विभागाचा कारभार वेळोवेळी पुढे येत असतो.

वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यानंतर ४८ तासांत तक्रार करणे आम्हाला बंधनकारक आहे. वन विभागाला नुकसान भरपाई देण्यासाठी मर्यादा असून अद्यापही मदत मिळाली नाही.
अजिंक्य मेडशीकर, शेतकरी, मेडशी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT