Vighnahar Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : विघ्नहर कारखान्याने पहिली उचल ३१०० रुपये द्यावी

Prabhakar Bangar, District President of Swabhimani Farmers' Association: जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला चांगला बाजार दर दिला नाही तर कारखान्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला चांगला बाजार दर दिला नाही तर कारखान्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.

संघटनेच्या वतीने कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विघ्नहर कारखान्याने चालू वर्षाच्या गाळप हंगामासाठी ३१०० रुपये पहिली उचल द्यावी. कारखान्याने २६२० रुपये एवढी कमी रक्कम शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी २८०० रुपये दर दिला आहे. असे असताना विघ्नहर सहकारी साखर कारखाना एवढा पाठीमागे कसा?

जिल्हाध्यक्ष बांगर यांनी कारखाना स्थळावरून कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. काही कामानिमित्त ते परराज्यांत असल्यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्याशी समक्ष चर्चा झाली. या वेळी घुले यांनी सांगितले, की मंगळवारी (ता. २८) कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा आहे. या सभेमध्ये आपण केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल.

आपण तूर्तास आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी बांगर यांना केली. मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहण्याचे मान्य केले. परंतु मंगळवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिने समाधानकारक निर्णय झाला नाही, तर विघ्नहर सहकारी साखर कारखान्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.

प्रमोद खांडगे पाटील, तुषार भोर, चंद्रकांत भिसे, अतुल भिसे, ज्ञानेश्वर भिसे, गोविंद भिसे, गणेश भिसे, अल्पेश पोखरकर उपस्थित होते.विघ्नहर कारखान्याने पहिली उचल ३१०० रुपये द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT