Mung and Urad Agrowon
ॲग्रो विशेष

Mung and Urad Guaranteed Rate : हमीभावाने मूग, उडीद विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ

Guaranteed Purchase Center : बाजारात सोयाबीनचा दर ४ हजारांपर्यंत घसरल्याने हमीभाव खरेदी केंद्र पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Team Agrowon

Akola News : शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमीभाव जाहीर केले जातात. यानुसार हंगामात खरेदीची प्रक्रिया राबवली जाते. या वर्षात हमीभावाने सुरू केलेल्या खरेदीत मूग, उडीद मुहूर्तालाही मिळाला नाही. सोयाबीनचीही जेमतेम सात हजार क्विंटलपर्यंत खरेदी पोहोचली. बाजारात सोयाबीनचा दर ४ हजारांपर्यंत घसरल्याने हमीभाव खरेदी केंद्र पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

या हंगामात मूग, उडीद खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनने ११२, तर विदर्भ मार्केटिंगने २७ केंद्र कार्यान्वयित केले होते. या एकूण १३९ केंद्रावर मूग, उडदाचा मुहूर्तही साधता आलेला नाही. ना शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती ना शेतीमाल दिला. या वर्षी सर्व केंद्रांना प्रतीक्षा होती.

सोयाबीनची जेमतेम खरेदी

हंगामात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी उपरोक्त दोन्ही यंत्रणांनी १३९ केंद्र कार्यान्वयित केले. यापैकी मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ५१०७ शेतकऱ्यांची नोंदणी होती. त्यापैकी मंगळवापर्यंत ४४१ शेतकऱ्यांनी ६०१७ क्विंटल सोयाबीन हमीभावाने विक्री केले. तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या १६४४ शेतकऱ्यांपैकी केवळ ९३ शेतकऱ्यांनी १२६४ क्विंटल सोयाबीनची विक्री केली.

बाजारात सोयाबीनचे सरासरी ४३०० रुपयांपर्यंत विकते आहे. किमान दर ४१०० रुपये असल्याने हमीभावाच्या तुलनेत ५०० रुपयांचा दरफरक आहे. यामुळे आता अनेक शेतकऱ्यांचा कल हमीभाव विक्रीकडे झुकू लागला होता. त्यातच ही खरेदीची प्रक्रीया थांबली आहे. शासनाने ९ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी अशी मुदत दिली होती.

या काळात केवळ एकूण ७२८१ क्विंटल सोयाबीन खरेदी होऊ शकलेली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी असंख्य शेतकरी विक्रीपासून लांबच आहेत. खुल्या बाजारात भाव कमी मिळत असल्याने शासकीय खरेदी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी सर्वच जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडून केल्या जात आहे.

हमीभाव

मूग ८५५८

उडीद ६९५०

सोयाबीन ४६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT