E-Pik Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E-Pik Pahani : ई-पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ ; अमरावतीत केवळ २३ टक्‍केच नोंदणी

E-Crop Survey : मोबाइल नेटवर्क, ॲपमधील तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन पेरा नोंदणीला प्रतिसादच दिला नाही.

Team Agrowon

Amravati News : शेतकरीस्तरावरच पीकपेऱ्याची नोंद व्हावी याकरिता शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अमरावती जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ २३ टक्‍केच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकपेरा नोंदविला आहे. तब्बल ४.७० लाख शेतकरी अशा नोंदीपासून दूर असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने यंदाच्या खरिपात पेरण्या लांबल्या. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या सुरू होत्या. शासनाने देखील १ जुलैपासून ई-पीक पाहणीची अंमलबजावणी केली. मात्र पावसालाच पाच जुलैपासून सुरुवात झाल्याने ऑनलाइन पीकपेरा नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. त्यातच मोबाइल नेटवर्क, ॲपमधील तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन पेरा नोंदणीला प्रतिसादच दिला नाही.

परिणामी जिल्ह्यातील ५.१३ लाख शेतकरी खातेदारांपैकी आजवर केवळ १.१६ लाख शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केल्याचे वास्तव समोर आले आहे. हे प्रमाण केवळ २३ टक्‍के असून तब्बल ४.७० लाखांवर शेतकरी ऑनलाइन पीकपेऱ्यापासून दूर असल्याचे चित्र आहे.

१६९७ खातेदारांची तलाठ्यांद्वारे ऑनलाइन पीक नोंद करण्यात आली. या दोन्हीच्या माध्यमातून १.८० लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांची ॲपद्वारे नोंद घेण्यात यश आले आहे. सुरुवातीला अशा प्रकारच्या नोंदीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत होती. आता त्यात वाढ करून १५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन निश्‍चित करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT