Fodder Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

चारा लागवडीसाठी हरियाणात एकरी १० हजारांची मदत

हरियाणात भटक्या गुरांची संख्या वाढत असून त्याप्रमाणात गोशाळांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात राज्य सरकारने या गोशाळांना चारा खरेदीसाठी १३.४४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

Team Agrowon

भटक्या गुरांची वाढती संख्या आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने राज्यात चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 'चारा बिजाई योजनेची' घोषणा करण्यात आली आहे.

हरियाणा सरकारने बुधवारी (दिनांक १० मे) 'चार बिजाई योजना' राबवणार असल्याची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी एकरी १० हजारांची आर्थिक मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १० एकर क्षेत्रात चाऱ्याची लागवड करता येणार असल्याचे कृषीमंत्री जे. पी. दलाल म्हणाले आहेत.

हरियाणात भटक्या गुरांची मोठी समस्या आहे. या गुरांसाठी राज्य सरकारतर्फे गोशाळा बांधण्यात आल्या आहेत. मात्र भटक्या गुरांची संख्या वाढत असून त्याप्रमाणात गोशाळांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात राज्य सरकारने या गोशाळांना चारा खरेदीसाठी १३.४४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

२०१७ साली हरियाणात १७५ गोशाळा होत्या. २०२२ मध्ये राज्यातील गोशाळांची संख्या ६०० च्यावर गेली आहे. त्यामुळेच चाऱ्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या चारा टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गोशाळांना चारा पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी एकरी १० हजारांची आर्थिक मदत केली जाणार आहे. हे पैसे थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार असल्याचेही दलाल म्हणाले आहेत.

या गोशाळांमधील शेणखताचा शेतात उपयोग केला जाऊ शकतो. पिंजोर, भिवानी आणि हिस्सार इथल्या गोशाळांमधील शेणखत तपासणीसाठी हरियाणा कृषी विद्यापीठाच्या हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कृषी व फलोत्पादन विभागाकडून या शेणखताची तपासणी केली जाणार असल्याचेही दलाल यांनी नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT