Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांनी पीकविमा हप्ता त्वरित भरून घ्यावा

Agriculture Update : सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक आदी कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरून घ्यावा.

Team Agrowon

Dharashiv News : सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक आदी कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरून घ्यावा.

शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांच्या नावात दुरस्ती करून घ्यावी. शेतकऱ्यांना याकरिता मार्गदर्शक करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

चालू खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना पोर्टल चालू झाले आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. पिकविमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी (सीएससी) किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक आदी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरुन घ्यावा.

पासबुक, आधार व सातबारावर एकच नाव असावे

विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरस्ती करुन घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जर शेतकऱ्याच्या नावात पूर्णत: बदल असेल, तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरुन घेऊ नये.

कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे, अशा बँक खात्यावरच विम्याची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधारकार्डवरील व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT