Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : पिकविणाऱ्यांकडे दुर्लक्ष नको ः शरद पवार

Sangola Agriculture Exhibition : शेतकऱ्यांच्याबद्दल गणपतराव देशमुख यांना आस्था होती. दुष्काळावर मात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट केले.

सुदर्शन सुतार

Solapur News : ‘‘आजच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबदल आस्था राहिली नाही. खाणाऱ्यांचा विचार जरूर केला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांनी पिकविलेच नाही तर काय खाणार ? यासाठी प्राधान्याने पिकविणाऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष नको,’’ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १९) व्यक्त केले.

सांगोला येथे ‘गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे’ उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘शेकाप’चे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, रतनबाई देशमुख, बळिराम साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड, जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्याबद्दल गणपतराव देशमुख यांना आस्था होती. दुष्काळावर मात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट केले. सांगोल्यातील शेतकऱ्यांनी डाळिंबाचे प्रचंड उत्पादन घेऊन महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना दिशा दिली. जगात साखरेची, कांद्याची मागणी असताना मोदी सरकारने कांदा, साखरेवर निर्यात बंदी घातली.

एकवेळ उपाशी राहील व लाचार कधीही राहणार नाही, अशी शिकवण गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यातील सर्व घटकांना दिली. त्यांचा विचार असाच पुढे न्या.’’ आमदार पाटील म्हणाले, ‘‘गणपतरावांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी पहिल्यांदा फळबाग लागवड योजना राबविली. सांगोला या आधीही गणपतरावांच्या विचारावर चालत आलेला आहे, यापुढेही तो तसाच राहील.’’

पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

गणेशरत्न पुरस्काराने या वेळी शेतकरी नाना माळी (गौडवाडी), पशुपालक - बिरा वाघमोडे (सावे), कृषी उद्योजक - विवेकानंद घेरडे (किडेबिसरी), नारायण काटकर (वाकी शिवणे), कृषिपूरक व्यवसाय - मोहन पवार (वाटंबरे) यांना गौरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT