Land Acquisition  
ॲग्रो विशेष

शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचा सदुपयोग करावा

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख ः पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे खरेदीखत

टीम ॲग्रोवन

पुणे ः पुणे-नाशिक मध्यम द्रुतगती रेल्वेमार्गाच्या (Pune Nashik Railway) कामाकरिता हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द, तुळापूर, भावडी या तीन गावांतील जमिनीच्या भूसंपादनाचे (Land Acquisition) खरेदीखत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘‘शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचा सदुपयोग करावा,’’ असे आवाहन डॉ. देशमुख यांनी या वेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे, महारेल (जमीन) सहमहाव्यवस्थापक भानुदास गायकवाड, महारेलचे (Maharail) सहमहाव्यवस्थापक सुनील हवालदार उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘हवेली तालुक्यातील मांजरी खुर्दचे ८ गट, तुळापूर २ आणि भावडीतील १ गटाचे खरेदीखत करण्यात आले असून, यामध्ये शेतकऱ्यांना ७८ कोटी रुपयांचा भूसंपादन मोबदला वाटप करण्यात येत आहे. हवेली तालुक्यातील पेरणे, भावडी, तुळापूर व मांजरी खुर्द गावांतील ७० टक्के खरेदीखताची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित खरेदीखते लवकरच पूर्ण करण्यात येतील.’’

खेड तालुक्यातील बाह्य वळणरस्ता व रेल्वे मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लवकरच त्यांच्याही भूसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येईल. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तातडीने रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मांजरी खुर्दचे माजी सरपंच किशोर उंद्रे यांनी जमीन खरेदीला चांगला मोबदला दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT