Beekeeping business  Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping business : शेतकऱ्यांनी मधाचे गाव तयार करावे

प्रशिक्षण कार्यक्रमात २५ शेतकऱ्यांना शात्रोक्त पद्धतीने मधमाशीपालन व त्यापासूनच्या मूल्यवर्धित पदार्थांवर असलेल्या अनुदानाबद्दल माहिती देण्यात आली.

Team Agrowon

karad Agriculture News : मधमाशी पालन हा व्यवसाय (Beekeeping business) शेतकऱ्यांसाठी एक चांगला जोड धंदा म्हणून विकसित होत आहे. बाजारपेठेतील मागणीचा विचार करता शेतकऱ्यांना मधमाशीपालन करणे फायदेशीर ठरू शकते.

शेतकऱ्यांनी शात्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन करून आपले गाव मधाचे गाव म्हणून समृद्ध करावे, असे प्रतिपादन कऱ्हाड उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी सुनील ताकटे यांनी केले.

कऱ्हाडचे (जि. सातारा) शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी सहकार शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या वतीने येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मधमाशी पालनासंदर्भात सात दिवसीय प्रशिक्षण झाले.

त्याच्या सांगता प्रसंगी ताकटे बोलत होते. प्रशिक्षण कार्यक्रमात २५ शेतकऱ्यांना शात्रोक्त पद्धतीने मधमाशीपालन व त्यापासूनच्या मूल्यवर्धित पदार्थांवर असलेल्या अनुदानाबद्दल माहिती देण्यात आली.

कृषी अधिकारी ताकटे म्हणाले, की मधमाशी पालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतल्यास तो व्यवसाय त्यांना शेतीमध्ये किवा आपल्या घरीसुद्धा करता येऊ शकतो.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सात्ताप्पा खरबडे यांनी प्रत्येक शेतकऱ्याने पिकाच्या विविध उत्पन्नांसाठी शेतात मधमाशी पेट्या घेऊन त्यांचे पालन करावे. स्वतःचा कृषीपूरक उद्योग चालू करावा, असे आवाहन केले.

प्रशिक्षणार्थी शेतकरी शैलेश जाधव, राहुल कुंभार, सुजाता मोहिते यांनी उपयुक्त माहिती दिली. डॉ. सी. एस. पाटील यांनी शेतकऱ्यांनी मधमाशीपालन उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Humani Bhunga Control: हुमणीच्या भुंगेऱ्यांचे वेळीच नियंत्रण का गरजेचे?

Digital Satbara Download: डिजिटल ७/१२ उतारा कसा डाऊनलोड करायचा?; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Migratory Birds: पाणवठ्यांवर सातासमुद्रापारचे पाहुणे दाखल

Sugarcane Payments Pending: थकीत एफआरपी न दिल्यास आंदोलन करणार : राजू शेट्टी

Water Shortage: गडहिंग्लज, आजरा तालुक्यांत शेतीला मे अखेरपर्यंतच पाणी

SCROLL FOR NEXT