Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनी प्रतिनिधीने पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी

Crop Insurance Compensation : कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

Team Agrowon

Satara News : कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो.

ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

विमा कंपनी प्रतिनिधी पडताळणी करण्यास आल्यास संबंधित शेतकरी यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा. विमा कंपनी प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्यास तत्काळ तक्रार द्यावी. अशा विमा कंपनी प्रतिनिधी, कंपनीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहीती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

या योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांमध्ये सहभाग घेतल्यांपैकी सुमारे २९ हजार बोगस अर्ज आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने प्रधान सचिव (कृषी) यांनी मृग बहर २०२४ मधील १०० टक्के सहभागी अर्जांची क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले आहे.

प्रधान सचिव यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मृग बहर २०२४ मधील सर्व बागांची पडताळणी कृषी विभागाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे, तथापि विमा कंपनी प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतावर अथवा निवासस्थानी जाऊन मी विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे व शासनाच्या आदेशावरून आपल्या फळबागेची पडताळणी करण्यास आलो आहे, अशी बतावणी करून आपली फळबाग आहे, असा माझा अहवाल गेल्याशिवाय आपणास विमा भरपाई रक्कम मिळणार नाही, असे खोटे सांगून काही शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ही बाब निदर्शनास आली आहे, याबाबत विमा कंपनी प्रतिनिधी विरोधात रितसर पोलिस तक्रार दाखल झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT