Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Management : पाणी, मृदा व्यवस्थापनात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करावे

Water Management : संस्थेत मृद व जल संधारण विभाग, जलसंपदा विभागातील विविध अधिकारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना जल व मृद व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येते. पारतंत्र्याच्या काळातच आपल्याला अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे मुळ असल्याचे दिसते.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : वाल्मीसारख्या देशात अग्रगण्य असलेल्या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या अभियंत्यानी पाणी व्यवस्थापन व मृदा व्यवस्थापनात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करुन आपली कर्तव्य पार पडावे, अशी अपेक्षा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी व्यक्त केली.

वाल्मी संस्थेच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित संवादबोध कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन श्री कटके बोलत होते. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे महासंचालक इंजि. वि. बा. नाथ, सहसंचालक इंजि. एस. सी. कापगते, सामाजिक शास्त्रे विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. राजेश पुराणिक, अभियांत्रिकी विद्याशाखा प्रमुख प्रा. ए.एस. गारुडकर, पाणलोट विकास व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख प्रा. डी.जी दूरबुडे, एच.डी.एफ.सी बँकेचे महाराष्ट्र आणि गोवा राज्य प्रमुख मॅथ्यू अब्राहम उपस्थित होते

श्री. कटके म्हणाले, की संस्थेत मृद व जल संधारण विभाग, जलसंपदा विभागातील विविध अधिकारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना जल व मृद व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येते. पारतंत्र्याच्या काळातच आपल्याला अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे मुळ असल्याचे दिसते. त्यावेळी स्त्रोत आणि तंत्राची कमतरता होती. परंतु गरीब घटकाला अन्न मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जल व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

आज महाराष्ट्रातून वाहून जाणारे पाणी थांबवता आले तर आपल्या नैसर्गिक संसाधनाची जपणूक करता येईल. महासंचालक इंजि. श्री. नाथ म्हणाले, की भविष्यातील वाल्मीचे रुप अधिक हायटेक आणि पर्यावरणपुरक व्हावे यासाठी वाल्मी आणि एचडीएफसी बँकेच्या सहाकार्याने पाच एकर जागेत वृक्ष लागवड करण्यात येत आहे. प्रास्वाविकात प्रा. डॉ. पुराणिक यांनी वाल्मीच्या इतिहासातील व वर्तमान काळातील कार्यावर दृष्टीक्षेप टाकला.

प्रा. डॉ. दूरबुडे यांनी वाल्मीचे योगदान यावरील सादरीकरणात संस्थेच्या सर्व बलस्थानांचा, प्रशिक्षण कार्यक्रमांचा, उपलब्ध भौतिक आणि नैसर्गिक साधनांचा आढावा सादर केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्य प्रवेश द्वाराजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर डॉ. विजय जाधव आणि सोनाली जाधव यांच्या चमूने बंजारा लोकनृत्य व लोकगीत प्रकार सादर केले.

कार्यक्रमात संस्थेतील प्रशिक्षण साहित्य पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. हर्षदा देशमुख यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT