Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : उद्दिष्टापेक्षा जास्त सोयाबीन खरेदीची परवानगी द्या

Soybean Farmers Demand : सोयाबीनचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त सोयाबीन खरेदीचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. तेलंगणाने ५९ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले.

Team Agrowon

Pune News : सोयाबीनचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त सोयाबीन खरेदीचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. तेलंगणाने ५९ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले. आणखी २५ हजार टन खरेदीची परवानगी कृषिमंत्री तुम्माला नागेश्वरा राव यांनी केंद्राकडे केली. तसेच त्यांनी मार्कफेडला खरेदीच्या सूचनाही दिल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र उद्दिष्टाच्या १५ टक्केही खरेदी झालेली नाही.

तेलंगणात सोयाबीनचे उत्पादन कमी होते. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीन खेरदीचे सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आले. महाराष्ट्रात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. तर मध्य प्रेदशात १३ लाख ६८ हजार टनांचे उद्दिष्ट आहे. मात्र या यापैकी महाराष्ट्रात आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ १४ टक्के खरेदी झाली. तर मध्य प्रदेशातील खरेदी २० टक्क्यांची पातळीही गाठू शकली नाही.

तेलंगणा सरकारने मात्र खरेदी परवानगी केंद्र सरकारने दिल्यानंतर लगेच खरेदीची प्रक्रिया सुरू केली. खरेदी केंद्रांना तातडीने परवानगी देत अडचणी सोडवल्या. त्यामुळे उद्दिष्टाचा विचार करता तेलंगणा सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीत आघाडीवर होता. केंद्र सरकारने यंदा तेलंगणात ५९ हजार ५०८ टन खेरदीचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट तेलंगणा सरकारने तीन दिवसांपूर्वीच पूर्ण केले.

तेलंगणाने सर्वांत आधी सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. केंद्राने दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले तरीही राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने खेरदी सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतरही तेलंगणा सरकारने लगेच केंद्राकडे तशी मागणी केली. तेलंगणा सरकारने केंद्राकडे पुन्हा २५ हजार टन खरेदीची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. मात्र तेलंगणा सरकारकडून त्याविषयी पाठपुरावा सुरू आहे.

तेलंगणाचे कृषिमंत्री तुम्माला नागेश्वरा राव यांनी केंद्राकडे आणखी २५ हजार टन खेरदीची परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्राने परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केंद्राला केली आहे.

तेलंगणातील सोयाबीन खेरदी

केंद्राने तेलंगणाला ५९ हजार ५०८ टन सोयाबीन खेरदीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी आतापर्यंत २७ हजार ८११ टन खरेदी अदीलाबाद जिल्ह्यात झाली. निर्मल जिल्ह्यात १४ हजार ४७६ टन, कमारेड्डी जिल्ह्यात ७ हजार ८६७ टन, निजामाबाद जिल्ह्यात ५ हजार ४१३ टन आणि संगारेड्डी जिल्ह्यात ३ हजार ३३९ टन खरेदी झाली, असे तेलंगाणाचे तुम्माला नागेश्वरा राव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT