Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : पीकविमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ

Heavy Rain Crop Loss : गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर करणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा खात्यात जमा केला जात आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर करणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा खात्यात जमा केला जात आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीअंतर्गत नुकसानाच्या केवळ २५ टक्केच पीकविमा दिला जात असून यामुळे अनेकांच्या खात्यात दोनशे रुपयांची मदत जमा झाल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात सुमारे पावणे तीन लाखांवर शेतकरी सभासदरांना ७८ कोटींचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. मागील खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर या काळात जिल्ह्यात बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली होती. या आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.

तेव्हा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत आपल्या तक्रारी दिल्या होत्या. कृषी विभाग व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. त्याचा सविस्तर अहवाल तयार करून पाठवण्यात आला होता.

या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी अनेक महिन्यांपासून पीकविमा लाभाची प्रतीक्षा करीत होते. ही रक्कम आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तळेगाव बाजार (ता. तेल्हारा) येथील शेतकरी गोदावरी गोवर्धन चोपडे यांच्या खात्यात २३१ रुपये ४२ पैसे जमा झाले आहेत. यामुळे विमा कंपनीविरुद्ध मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनेकांची नाराजी

पीकविम्याची रक्कम खात्यात जमा होऊ लागली आहे. जिल्‍ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे-अडीचशे रुपये जमा झाले आहेत. काहींना एकरी तीनशे ते साडेतीनशे रुपयेच मदत मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी निधी मिळाल्याने नाराजीचा सूर आहे. नुकसान मोठे झालेले असताना केवळ २५ टक्के मदतीचा निकष कुठल्या आधारे लावला गेला, असा प्रश्‍नही विचारला जात आहे.

मी ९८ आर क्षेत्रफळावर खरिपात उडीद पेरणी केली होती. अतिपावसाने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले होते. आता एकरी ३१९ रुपये पीकविमा मदत खात्यात जमा झाली. एवढ्या मदतीचे काय करायचे.
- मधूकर कुकडे, पाथर्डी, ता. तेल्हारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT